आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची सलामी:धुळ्यात वादळाने वृक्ष उन्मळले; वीजपुरवठा खंडित पिंपळनेरसह परिसरात जोरदार पाऊस, वाहतूक ठप्प

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रात्री उशिरा तर जिल्ह्यात दुपारी ३ वाजेनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. शहरातील काही भागात वृक्षाच्या मोठ्या फांद्या तर काही वृक्ष काेसळून नुकसान झाले. वृक्षामुळे वीजपुरवठा करणाऱ्या ताराही तुटल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर सामोडे, पिंपळनेर व परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस. शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर घरांचे पत्रेही उडाले झाडे कोसळल्याने वाहुक विस्कळीत झाली होती. तर लोणखेडी येथे वीजपडून तीन गुरांचा मृत्यू झाला.

शहरात शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारात वातावरणार बदल होवून साक्री रोड परिसरातील महिंदळे शिवारात वाऱ्यासह पावसाळ्याच्या सरीने हजेरी लावली. पाच ते दहा मिनिट सरी कोसळ्याने रस्ते ओेले झाले होते. तसेच वलवाडी, नगांवबारी परिसरातही काही भागात पावसाच्या सरी पडल्यात. शहरात रात्री ८ वाजेनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात कमी अधिक प्रमाणावर रिमझिम पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्ते ओले झाले. पाऊस व वीजपुरवठा खंडीत झाल्याने रात्री आठ वाजताच आग्रा रोडवरील बाजारात शुकशुकाट झाला होता. अनेक व्यापारी नेहमीपेक्षा लवकर दुकाने बंद करुन घरी गेले. वादळाने देवपुरातही फांद्या पडून वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा एक ते दोन तास खंडीत झाला होता.

वाहनांचेही झाले नुकसान
पिंपळनेर | साक्री तालुक्यातील सामोडे, पिंपळनेर व परिसरात दुपारी ३.३० वाजेपासून विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काहींच्या चाळीचे पत्रे उडून, काही घरांवर तर वाहनांवर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सामोडे नावागाव येथील उत्तम आत्माराम उपासने, राजेंद्र घरटे तर सामोडे जुनागाव येथील जितेंद्र विश्वास शिंदे अश्या बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून राजेंद्र धोंडू घरटे यांच्या चार चाकी वाहनावर झाड कोसळून वाहनाचे नुकसान झाले. आदिवासी रहिवासी लक्ष्मण आत्या भारुड यांच्या घराचेही पत्रे उडून नुकसान झाले.

साक्री तालुक्यात तीन गुरांचा मृत्यू
साक्री तालुक्यातील लोणखेडी येथे सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी लोणखेडी गावातील शेतकरी बारकू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील तीन गुरांचा वीज पडून मृत्यू झाला. यात सव्वा लाख रुपये किमतीचे तीन गुरे मृत्यू पावले. यात एक गाय, एक वासरू व अजून एक गुराचा समावेश आहे. वीज पडल्याने गुरांचा मृत्यू झाला असून फे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

कापडणे परिसरात तुरळक हजेरी
कापडणे | सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी पावसाने कापडणे परिसरात हजेरी लावली. मात्र परिसरात बऱ्याच ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली. मात्र बोरिस, रामी परिसरात वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. सायंकाळ झाली असल्याने नेमके नुकसान लक्षात आले नाही. कापडणे गावात व काही परिसरात पाऊस बरसला मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...