आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:राष्ट्रीय एकात्मता ठेवण्याचा‎ विद्यार्थ्यांनी केला दृढ संकल्प‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक‎ संस्थेच्या भाऊसाहेब ना. स. पाटील‎ साहित्य आणि मुल्ला फिदा अली‎ मुल्ला अब्दुल अली वाणिज्य‎ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा‎ योजना विभागातर्फे राष्ट्रीय एकता‎ दिनानिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय‎ एकात्मतेची शपथ देण्यात आली.‎ तसेच राष्ट्रीय एकता दौड काढण्यात‎ आली.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला‎ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल‎ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात‎ आले.

या वेळी प्रा. शशिकांत बोरसे,‎ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे‎ जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद‎ पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ.‎ अशफाक शिकलगर, विद्यार्थी‎ विकास अधिकारी डॉ. पौर्णिमा‎ वानखेडे, राष्ट्रीय सेवा योजना‎ विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.‎ नीलेश पाटील, सहायक कार्यक्रम‎ अधिकारी डॉ. शरद भामरे आदी‎ उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी‎ डॉ. नीलेश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा‎ योजना विभागाच्या कार्याची माहिती‎ दिली. प्रा. शशिकांत बोरसे यांचा‎ सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात‎ आला. त्यांनीच राष्ट्रीय सेवा योजना‎ विभागाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय‎ एकतेची शपथ दिली. राष्ट्रीय सेवा‎ योजना आणि व्यक्तिमत्त्व‎ विकासावर प्रा. डॉ. अशफाक‎ शिकलकर यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...