आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला दिवस:पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे तोंड गोड; गुलाबपुष्प देऊन स्वागत

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ झाला. विद्यार्थी बुधवारपासून शाळेत येणार असले तरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पूर्व तयारीसाठी सोमवारी शाळेत आले. पहिल्या दिवशी शाळेत स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांचे बुधवारी (दि.१५) स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोड पदार्थ आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत होणार आहे. कोविडमुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. यंदा पहिल्या दिवसापासून शाळा सुरू होणार आहे. त्यानुसार सोमवारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना विविध सूचना देण्यात आल्या. वर्ग सजावट व स्वच्छता झाली. विद्यार्थी बुधवारपासून शाळेत येतील. त्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक मिळतील. जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पुस्तक वाटप होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली.

सहविचार सभेत सूचना...
धुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची चावरा हायस्कूलमध्ये सहविचार सभा झाली. शिक्षणाधिकारी राजेश साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे उपस्थित होते. विविध विषयांवर चर्चा झाली.

मेनू प्रमाणेच पोषण आहाराचे वाटप करण्यात यावे
शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्या, पाण्याच्या टाकीची स्वच्छता करावी, अशी सूचना शिक्षणाधिकारी साळुंखे यांनी केली. पोषण आहार मेनूप्रमाणे वाटप करावा. शिष्यवृत्तीचे नियोजन करावे, अशी सूचना केली. सतीलाल कोळी, व्ही.बी. घुगे, संजय विभांडिक, रंजना नांद्रे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...