आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:टँकरने चार वाहने,‎ एक टपरी उडवली‎

धुळे‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा रोडवरून शहराच्या दिशेने‎ येणाऱ्या भरधाव वेगातील टँकरने‎ कार, रिक्षा, स्कुटीसह सुमारे ४‎ वाहन व टपरीला धडक दिली. या‎ घटनेत चार जण जखमी झालेे‎ असल्याची प्राथमिक माहिती‎ पोलिसांनी दिली. या प्रकरणी‎ मद्यपी टँकर चालक राजेंद्र‎ सकटला ताब्यात घेण्यात आले‎ आहे.‎ शहराच्या दिशेने येणारा टँकर‎ (जीजे-१६-एयु-५१७५) भरधाव‎ वेगाने निघाला होता.

महामार्गावर‎ टँकर चालकाने एकाला धडक‎ दिली. त्यानंतर सुसाट वेगाने हा‎ टँकर पारोळा रस्त्याने शहरात‎ आला. टँकरने साक्री रोडवरील‎ जिल्हा रुग्णालयाजवळ ओमनी‎ कारला (एमएच-१९-एई-६८३३),‎ एका टपरीला धडक दिली.‎

त्यानंतर शिवतीर्थ चौकातून‎ डावीकडे वळण घेत रिक्षाला‎ (एमएच-१८-बीएच-०१३४) व‎ नंतर एका स्कूटीला धडक दिली.‎ त्यानंतर पुन्हा एका रिक्षाला टँकरने‎ धडक दिली. तोपर्यंत पाठलाग‎ करत येत आलेल्या काही‎ नागरिकांनी टँकर अडवला. तसेच‎ चालकाला पोलिसांच्या ताब्यात‎ दिले. पोलिसांनी अधिकृत दुजोरा‎ दिला नाही. घटनेनंतर‎ घटनास्थळी झाली होती.‎

बातम्या आणखी आहेत...