आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी वाढण्यास सुरुवात:एकाच दिवसात तापमान 2  अंश सेल्सिअस घसरले

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यासह शहरात दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात रविवारी किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर सोमवारी एकाच दिवसात त्यात दोन अंशाने घसरण होऊन तापमान ७.४ अंशांवर आले होते. शहरात थंडीचा प्रकोप वाढला असून, रात्री नऊ वाजेनंतर रस्त्यावर शुकशुकाट होत असल्याचे चित्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

डिसेंबरमध्ये किमान तापमान १० ते ९ अंश सेल्सिअस होते. तसेच दिवसाचे कमाल तापमानही ३० अंशाच्या खाली आले आहे. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेनंतर वातावरणात गारठा जाणवतो. शहराचे किमान तापमान सोमवारी ७.८ व कमाल तापमान २८.५ अंश सेल्सिअस नांेदवण्यात आले होते. किमान तापमान रविवारी ९.६ अंश सेल्सिअस होते. यापूर्वी २५ डिसेंबरला किमान ७.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...