आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात चढउतार:तापमान 48 तासांत 4 अंशांनी घसरले

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून शहराच्या तापमानात होणारा चढउतार कायम आहे. दोन दिवसांपूर्वी १४ अंशांवर असणारे किमान तापमान मंगळवारी १० अंशांवर आले. गेल्या ४८ तासांत तापमान ४ अंशाने घसरले. दोन दिवसांपूर्वी ते १४ अंश होते.

शहराच्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याची स्थिती आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस थंडी वाढली होती. तसेच १० डिसेंबरला यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी ५ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर कमाल व किमान तापमानात वाढ होत गेली. तसेच ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमान ३० अंश होते.

तसेच रात्रीचे किमान तापमान १९ अंशांपर्यंत वाढले होते. त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता. उकाडा वाढला होता. त्यानंतर मंगळवारी तापमान पुन्हा घसरले. कमाल ३० व किमान १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

दिवसाच्या तापमानात फारसा फरक पडलेला नाही. मात्र, रात्रीचे किमान तापमान ४ अंशाने कमी झाल्याने थंडी वाढली आहे. सोमवारी किमान तापमान १२.४ अंश तर शनिवारी १६.८ अंश सेल्सिअस होते. तसेच ११ डिसेंबरला किमान १० अंश सेल्सिअस होते. त्यानंतर दहा दिवसानंतर पुन्हा किमान तापमान १० अंशावर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...