आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घट:तापमान एकाच दिवसात 4 अंश घसरून 34 अंशांवर स्थिरावले

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे तापमानाचा पारा ४ अंशांनी घसरून ३४ अंशांवर आला. त्यामुळे नागरिकांची उन्हाच्या झळांपासून सुटका झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून तापमान ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त होते. उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे दुपारी बारा वाजेनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. शहरात ११ व १२ जूनला चांगला पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून उष्णतेचे प्रमाण कमी झाले आहे. तापमान एकाच दिवसात ४ अंशांनी कमी झाले आहे. शहरात सोमवारी कमाल ३४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तसेच आर्द्रतेचे प्रमाण ७६ टक्के होते.

नेर, कुसुंबा, खेडा परिसरात ६५ मिलिमीटरपेक्ष जास्त पाऊस धुळे तालुक्यातील कुसुंबा व खेडा मंडळात रविवारी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. धुळे तालुक्यातील लामकानी, कापडणे भागात शनिवारी पाऊस झाला होता. त्यानंतर रविवारी धुळे मंडळात ३९ मिमी, कुसुंबा मंडळात ७३ मिमी, खेडा मंडळात ६९ मिमी, नेर मंडळात ५२ मिमी, सोनगीरला १८ व नगावमध्ये १७ मिमी पाऊस झाला. शिंदखेडा मंडळात १७ मिमी, नरडाणा मंडळात ६० मिमी, बेटावद मंडळात ५५ मिमी, शिरपूर तालुक्यातील बोराडी मंडळात २८, सांगवी मंडळात ३१ मिमी. पाऊस झाला. साक्री तालुक्यात दुसाने मंडळात १०, कासारे मंडळात ९, उमरपाडा मंडळात ११ मिमी पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...