आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शहाद्यात वर्दळीच्या वृंदावन नगरातून दुचाकीची चोरी

शहादा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या वृंदावन नगरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.शहरातील जुन्या पोस्ट गल्लीतील रहिवासी राजेश जैन यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच ३९ एल ९०५३) बाहेर उभी केली असता चोरट्यांनी चोरून नेली. शहरात सध्या महिनाभरात कमीत कमी सात ते आठ मोटारसायकलींची चोरी हाेत आहे.

या चाेरीच्या सत्रामुळे शहरात मोटारसायकल चाेरट्यांची स्वतंत्र टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी या टोळीचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...