आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:धावत्या ट्रकमधून केली दीड लाखांच्या कापड गठ्ठ्यांची चोरी

शहादा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राज्यातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या कपड्यांचे बॉक्स भरलेल्या ट्रकमधून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे बॉक्स चोरीस गेल्याची घटना गुरुवारी घडली. पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ केल्याने व्यावसायिक हैराण झाला आहे.

मोहंमद अझहर हा (एमएच १८ एए ९६८८) क्रमांकाच्या ट्रकने गुजरातमधील वापी येथून कपड्यांचे गठ्ठे घेऊन ते मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी नेत हाेता. तालुक्यातील दरा फाटा ते किती या दरम्यान ट्रकमधून १५ गठ्ठे चोरीला गेले. त्यांची किंमत सुमारे दीड लाखापर्यंत असल्याचे सांगितले. वापी ते शहाद्यापर्यंत मोहंमद मझहर याने ट्रक चालवला होता. शहाद्यापर्यंत कपड्यांचे सर्व गठ्ठे व्यवस्थित होते. तेथून मोहंमदच्या वडिलांनी ट्रक चालवायला घेतला होता.

किती येथे ते थांबले असता चौकशी केली तेव्हा ट्रकमधून कपड्यांचे गठ्ठे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती खेतिया पोलिसांना दिली. मात्र त्यांनी म्हसावद पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. म्हसावद येथील पोलिसांनी शहादा पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...