आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तळाेदा प्रकल्प कार्यालयातर्फे तिन्ही अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करून गाैरव; सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तिवेतनाचा लाभ

तळोदा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी एन.डी. ढोले यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना त्यांचे निवृत्तिवेतन व इतर लाभ मंजूर करण्यात येऊन एक आदर्श पायंडा सुरू करण्यात आला.

येथील प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी अमितकुमार वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी ढोले, लेखा विभागाचे डी.डी. दावळे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम प्रकल्प कार्यालयात पार पडला. अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी मैनाक घोष तर प्रमुख पाहुणे म्हणून नियोजन अधिकारी निर्मलकुमार तोरवणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.एम. साबळे, एस.टी. पावरा, के.सी. कोकणी, जी.डी. वाणी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रकल्प कार्यालयातील सेवानिवृत्त झालेल्या तिन्ही अधिकाऱ्यांचा प्रकल्प अधिकारी घोष यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमात सन्मानार्थी मान्यवरांचा आदिवासी विकास विभागाच्या सेवेतील आठवणींना उजाळा देत गौरव करण्यात आला. सेवा कुटुंबीयांनी व कार्यालयातील सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकल्प अधिकारी घोष म्हणाले की, कार्यालय हे एक परिवार असताे. त्यातील प्रत्येक सदस्य हा कुटुंबाचा खांब असतो. प्रकल्प कार्यालयाचे ३ महत्त्वाचे खांब प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी सिटू आश्रमशाळा शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संघटना, एकलव्य स्कूल पालक समिती यांनी सत्कार केला.

हा पायंडा पुढे कायम रहावा; साऱ्यांची अपेक्षा
सेवापूर्तीचा कार्यक्रम सुरू असताना आदिवासी विकास विभागाच्या नाशिक आयुक्तालयाकडून सहायक प्रकल्प अधिकारी अमित वसावे यांच्यासाठी प्राप्त आदिवासी उपायुक्तांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी ढोलेंना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तिवेतन, विमा, भविष्यनिर्वाह निधी रक्कम व इतर सर्व लाभ मंजूर केल्याची माहिती दिली. यासाठी प्रकल्प अधिकारी घोष यांच्या मार्गदर्शनात सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, जी.डी. वाणी, वरिष्ठ लिपिक राजेंद्र गोसावी, पुष्पक पाटील यांनी प्रयत्न केले. दरम्यान सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्याचा हा पायंडा कायम सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त झाली.

बातम्या आणखी आहेत...