आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वेळापत्रक जाहीर:चार वेळा बदलले बदलीचे वेळापत्रक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा घोळ अद्यापही संपलेला नाही. महिनाभरात चार वेळा शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक बदलवण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकांसह शिक्षण विभागांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी चौथ्यांदा नवीन वेळापत्रक जाहीर केले.

शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी दिवाळीपूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पण दिवाळीत बदली प्रक्रिया राबवणे शिक्षण विभागासह शिक्षकांसाठी अशक्य असल्याने शासनाने वेळापत्रकात बदल केला. नवीन धोरणानुसार बदलीची प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे दुसऱ्यांदा जाहीर केलेला बदली प्रक्रियेचा कार्यक्रम बारगळला. त्यानंतर १८ नोव्हेंबरला तिसऱ्यांदा नवीन वेळापत्रक जाहीर झाले. त्यातही त्रृटी असल्याने पुन्हा वेळापत्रक रद्द झाले. आता चौथ्यांदा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २९ नोव्हेंबरपासून बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...