आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:साक्री कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने चिंचपाडा येथील तिघांना जिल्हा रूग्णालयात पाठवले

नवापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तिघांना सध्यातरी कोरोनाचे लक्षणे नाही

धुळे जिल्ह्यातील साक्री कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आल्याने नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील एका दांपत्यासह चालकाला नवापुर तालुका प्रशासनाने तात्काळ घरी गाठून त्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन व प्राथमिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. चिंचपाडा येथील तिघांचा संपर्कातील आलेले परिवारातील चार पाच लोकांना होम क्वारंटाईन करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

धुळे शहरात एका रूग्णालयात चिंचपाडा येथील दाम्पत्य डायलिसीस करण्यासाठी एका गाडीने 8 एप्रिल रोजी खाजगी गाडीने एका चालकासह तीन व्यक्ती धुळे येथे गेले असता त्यादरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मृतक कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचा संपर्कात आल्याची घटना सी.सी.टी.व्ही कॅमेरेत कैद झाल्याने तात्काळ धुळे जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासनाला कळवले त्यांनी नवापूर तालुका प्रशासना माहिती दिली 

नवापूर तालुक्यातील अधिकारी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी हरिषचंद्र कोकणी पोलीस व आरोग्याची टिमने चिंचपाडा येथे जाऊन एका दांपत्यासह चालकाला ताब्यात घेऊन नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.

तिघांना सध्यातरी कोरोनाचे लक्षणे नाही.

चिंचपाडा येथील एका दांपत्यासह चालकाला शोधून नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांना सध्यातरी कोरोना आजाराचा संदर्भात लक्षणं दिसून आले नाही परंतू खबरदारी म्हणून त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे त्याचे नमुने घेतले जाणार आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याचे काम नाही.नवापूर तालुक्यात किंवा जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही. - हरिषचंद्र कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी,नवापूर

बातम्या आणखी आहेत...