आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वखार:स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी लुटली होती धरणगावची वखार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या इतिहासात रणवीर, रणधुंरदर अशी ओळख असलेले छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी खान्देशातून जातांना धरणगाव येथील इंग्रजांची वखार लुटली होती. त्याचबरोबर त्यांनी इंग्रजांना पळो की सळो करुन सोडले होते, असा उल्लेख इंग्रज अधिकारी आऊट ड्रॅमने इतिहासात केला आहे. हा संदर्भ आजही उपलब्ध आहे. तसेच इतर इतिहासकारांच्या संदर्भाशी तो जुळणारा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहासाचे संदर्भ तपासल्यावर त्यातून ही माहिती पुढे आली.

स्वातंत्र्यपूर्व काळात खान्देशातही बंडाचा ध्वज फडकला होता. हे बंड चिरडून काढण्यासाठी इंग्रज अधिकारी आऊट ड्रॅम याची नियुक्ती झाली होती. आऊट ड्रॅम या अधिकाऱ्याला इतिहासाची आवड होती. हा अधिकारी रोज विविध नोंदी घेत असे. आऊट ड्रॅम यांनी केलेल्या नोंदीमध्ये धरणगाव येथील वखारीच्या लुटीचा उल्लेख केला आहे. सन १६६५ मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी इंग्रजांच्या या वखारीवर स्वराज्यासाठी हल्ला चढवला होता. शिवाय मौल्यवान वस्तू, दारुगोळा, कच्चा माल व काही आवश्यक वस्तूंची लुट केली होती. शिवाय जातांना ही वखार नष्ट करण्यात आली होती. संभाजी महाराज व मराठी सैन्याने लुटलेली ही वखार नेमकी कशी होती, या वखारीचे झालेले नुकसान, वखारीला पुनर्जीवित करण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या प्रयत्नांची नोंदही आऊट ड्रॅम याने घेतली होती. धरणगावनंतर चोपडा व बऱ्हाणपूर येथील वखार लुटल्याचा उल्लेखही काही इतिहासकारांच्या नोंदीतून समोर आला आहे. त्यामुळे आऊट ड्रॅम यांचा उल्लेख इतर काही अभ्यासकांच्या संदर्भाशी जुळणारा आहे. मुळात वखारींच्या सुरक्षेबद्दल नोंदी घेतांना छत्रपती संभाजी राजे यांचा उल्लेख आऊट ड्रॅम याने घेतला होता. आऊट ड्रॅम यांचा हा ऐतिहासिक संदर्भ निश्चितच भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...