आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:जलवाहिनीला महिन्यापासून गळती; दुरुस्तीकडे कानाडोळा

धुळे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक भागातील जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यातही देवपुरातील सुशी नाल्याजवळून गेलेल्या जलवाहिनीला एक महिन्यापासून गळती लागली आहे. याविषयी तक्रार करूनही गळती थांबवण्यात आलेली नाही. शहरातील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांना वारंवार गळती लागते. महिन्यातून पंधरा ते वीस ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली असते.

काही जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती केली जाते पण काहींची गळती थांबवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे. देवपुरातील सुशी नाल्यावर असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहे. दोन्ही बाजूच्या जलवाहिनींना गळती लागली आहे. याविषयी नगरसेवक सईद बेग यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली. पण अद्यापही गळती थांबवण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...