आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी लालसर:नरडाणा एमआयडीसीजवळील विहिरीतील पाणी लालसर

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहती जवळील मेलाणे आणि वारुड शिवारात असलेल्या विहिरीतील पाण्याचा रंग लालसर झाला आहे. याविषयी परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी विभागाकडे तक्रार केली पण अधिकारी आलेले नाही.

नरडाणा औद्योगिक वसाहतीत उद्योगांची संख्या वाढते आहे. वसाहतीजवळ वारुड आणि मेलाणे शिवारात असून, या ठिकाणी असलेल्या शेतातील विहिरीच्या पाण्याचा रंग काही दिवसांपासून बदलतो आहे. वारुड येथील शेतकरी भागवत राजधर पवार आणि सुरेश नारायण पाटील, मेलाणे येथील चिंधा नारायण पाटील, सचिन दयाराम वाघ, धर्मा नवल पाटील, शालिग्राम श्रीपद पाटील यांच्या विहिरीतील पाण्याचा रंग लाल झाला आहे. या पाण्याला दुर्गंधी येत नसली तरी हे आता पिण्यासाठी वापरले जात नाही. शेतकरी पिकांनाही हे पाणी दिले जात नाही. पाण्याचा रंग बदलल्याने शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांकडे तक्रार केली. पण उपयोग झाला नाही. जिल्हा प्रशासनाने याविषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पाण्याचा रंग का बदलला याविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

शेतकरी तपासणार पाणी
बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडल्यावर त्यांनी पाहणी केली. पण पाण्याची तपासणी करावी लागेल असे सांगितले. पाण्याचा रंग कोणत्या कारणामुळे लाल होतो हे समजणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांनी आता वैयक्तीकस्तरावर पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...