आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापांझरा कान सहकारी साखर कारखान्याचा करारनामा प्रक्रिया अखेर पूर्ण झाली. स्पर्श शुगर इंडस्ट्रीजचे मालक पवन मोरे यांच्यात व शिखर बँक यांच्यात हा करार झाला. करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तहसील कार्यालयाचा आवारात फटाके फोडून व ढोल-ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच पवन मोरे व भांडणेचे उपसरपंच धनंजय अहिरराव यांचा सत्कार केला. कारखाना मधील मशनरीचे पवन मोरे यांच्या हस्ते पूजन केले. पंचायत समिती उपसभापती ॲड.नरेंद्र मराठे, मनसेचे नेते धीरज देसले, अनिल देसले शेतकरी उपस्थित होते.
कारखाना सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न : पत्रकार परिषदेत पवन मोरे यांनी सांगितले की, पांझरा कान साखर कारखाना लवकरच सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असून तालुक्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या उत्कर्षासाठी यथोचित प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारखाना व त्यासह इतर प्रोजेक्टच्या माध्यमातून तालुक्यात ३ ते ४ हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल, अशी ब्लू प्रिंट तयार केली आहे. शुगरसह इथेनॉल निर्मितीवर भर देणार आहेत. इथेनॉलच्या मागणीत २० टक्के वाढ झाल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही फायद्याची ठरणार आहे. कारखाना सुरू करू नये यासाठी काहींनी अडचण निर्माण करण्याचे प्रयत्न केले, असे सांगितले.
जुनी मशिनरी दिली बँकेच्या ताब्यात
कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्यात उपलब्ध असलेली जुनी मशनरी कुठल्याही कामात येणार नाही. त्यामुळे ही मशनरी बँकेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच नवनिर्मितीसाठी नवीन अत्याधुनिक मशनरी मागवण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक पवन मोरे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.