आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:वीज कंपनीच्या दोघा लाचखोरांची वाइन शॉप मालकाने उतरवली नशा

धुळे/शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथील वाइन शॉपच्या वीज मीटरसाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून १० हजारांची लाच घेणाऱ्या दोघांना गुरुवारी रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यात कनिष्ठ अभियंता समाधान पाटील व तंत्रज्ञ नीलेश माळी यांचा समावेश आहे. शिरपूर-वरवाडे येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे खंबाळे येथे बिअर व वाइन शॉप आहे. या वाइन शॉपमध्ये वीजमीटर बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता.

या अर्जाची प्रत घेऊन तक्रारदार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते. या वेळी कनिष्ठ अभियंता समाधान सुधाकर पाटील यांची त्यांनी भेट घेतल्यावर त्यांना वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश मनोहर माळी यांना भेटण्यास सांगण्यात आले. नीलेश माळी यांनी पाटील यांच्या सांगण्यावरून १० हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बुधवारी तक्रार केली होती.

त्यानंतर पथकाने शिरपूर येथील वीज कंपनीच्या बाहेर समाधान पाटील यांच्या वतीने नीलेश माळी यास १० हजारांची लाच घेतांना ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, कर्मचारी राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला आदींनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...