आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:पांझरेवरील ब्रीज कम बंधाऱ्याचे काम तब्बल 5 वर्षांपासून रखडले

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर प्रभात नगरजवळ सन २०१७ मध्ये ब्रीज कम बंधारा मंजूर करण्यात आला. हे काम ७० टक्के झाले असून पुढील काम रखडले आहे. या बंधाऱ्याच्या शेजारी आता नव्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.पांझरा नदीच्या काठावर दोन्ही बाजूला समांतर रस्त्याचे काम सन २०१७ मध्ये सुरू झाले होते. या कामातंर्गत देवपूरातील प्रभातनगर जवळ ब्रीज कम बंधारा मंजुर होता.

या बंधाऱ्याचे ७० टक्के काम झाले. हे काम मंजूर होऊन पाच वर्षाचा कालावधी उलटला पण राजकीय कुरघोडीसह निधी मिळत नसल्याने काम कासवगतीने काम सुरु आहे. अपूर्णावस्थेतील या बंधाऱ्याला कठडे बसवलेले नाही. या ठिकाणी रात्री अंधार पडल्यावर मद्यपी बसतात. दुसरीकडे आता या बंधाऱ्याच्या शेजारी नवीन पुल उभारण्याचे काम सुरू आहे. पण ब्रीज कम बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले तर देवपूरमधून थेट बाजार समितीकडे जाता येईल. बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यासाठी सन २०१९ अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...