आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थी पादचारी पुलाचे काम जूनपूर्वी पूर्ण‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शहरातील साक्री राेडवरील गरुड‎ काॅम्प्लेक्सजवळ असलेल्या‎ शैक्षणिक चाैकात शाळा‎ सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस‎ हाेणारी वाहतूक काेंडी‎ टाळण्यासह विद्यार्थ्यांच्या‎ सुरक्षेसाठी पादचारी पुलाचे काम‎ सुरू आहे. बाफना हायस्कूलच्या‎ बाजूने पुलाच्या जिन्याचे काम पूर्ण‎ झाले आहे. कमलाबाई शाळेच्या‎ बाजूला पायऱ्यांचे काम सुरू आहे.‎ हे काम जूनपर्यंत पूर्ण होईल.‎ शैक्षणिक चौकात कमलाबाई,‎ जिजामाता, शिवाजी हायस्कूल,‎ बाफना हायस्कूल, डीएड काॅलेज‎ आदी शैक्षणिक संस्था आहेत.‎ त्यामुळे या चौकात सकाळी सात‎ ते आठ, सकाळी ११ ते दुपारी १ व‎ सायंकाळी ५ ते ६ या वेळेत‎ विद्यार्थ्यांची गर्दी असते. चाैकात‎ तालुका क्रीडा संकुल आहे.‎

याठिकाणी अनेक जण खरेदीसाठी‎ येतात. चाैकात सिग्नल असले तरी‎ ते अद्याप कार्यान्वित नाही.‎ परिणामी विद्यार्थ्यांना रस्ता‎ आेलांडण्यासाठी कसरत करावी‎ लागते. या ठिकाणी शाळा‎ सुटल्यावर रोज लहान मोठे‎ अपघात होतात. अनेकदा वाहतूक‎ पाेलिस विद्यार्थ्यांना रस्ता‎ आेलांडण्यासाठी सहकार्य‎ करतात. चौकात होणारे अपघात‎ टाळण्यासाठी आमदार फारूख‎ शाह यांच्या स्थानिक विकास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ निधीतून पादचारी पुलाचे काम‎ सुरू आहे.

त्यासाठी रस्त्याच्या‎ दाेन्ही बाजूला जिना केला जाणार‎ आहे. त्यानुसार बाफना शाळेच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रवेशद्वाराशेजारी जिना उभारण्यात‎ आला आहे. कमलाबाई शाळेच्या‎ संरक्षण भिंतीलगत जिन्याचे काम‎ सुरू आहे. दाेन्ही बाजूला जिना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उभारल्यावर साक्री राेडवर‎ मध्यभागी कॉलम उभारून त्यावर‎ लाेखंडी पूल तयार केला जाईल.‎ काम जूनपर्यंत पूर्ण होईल.‎

विद्युत खांब हटवणार‎
पुलासाठी लाेखंडी प्लॅटफाॅर्म‎ उभारण्यापूर्वी याठिकाणी असलेले‎ विद्युत खांब, विजेच्या वाहिन्या‎ हटवाव्या लागणाार आहे.‎ त्याशिवाय पूल उभारणे शक्य‎ नाही.याबाबत वीज कंपनीला‎ कल्पना देण्यात आली आहे.‎ लवकरच या कामालाही सुरुवात‎ हाेईल.किमान तीन ते साडेतीन‎ महिने पुलाच्या कामाला‎ लागण्याची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...