आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांची क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी:बेटावदमधील कामांची फेरतपासणी करावी

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेटावद गावात चौदा व पंधराव्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी बेटावद येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. बेटावद गावात चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगातून विकास कामे करण्यात आली. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. तसेच काही कामे कागदावर करण्यात आली आहे. तुटपुंजा निधी खर्च करून लाखो रुपये हडप करण्यात आले आहे.

या प्रकरणाची चौकशी झाली. त्यातून सर्व प्रकार समोर आला. ग्रामसेवक अडीच महिन्यांपासून गावात आलेले नाहीत. आता तक्रारदारांना धमकावत आहे. गावात झालेल्या कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे चौकशी करावी, चौकशी अहवाल ग्रामस्थांना देण्यात यावा, बोगस कामांची बिले देऊ नये, दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी बेटावद येथील अनिल महाले, प्रभाकर कोष्टी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, विनोद वडर, उमेश माळी, मयूर माळी, कमलेश माळी, बंटी देशमुख आदींनी केली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आठ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...