आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या कोणत्या:आठ महिन्यांपासून उद्योग मित्र तर वर्षापासून सुरक्षा चीही नाही बैठक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योजकांचे प्रश्न लवकर सुटावे यासाठी जिल्हा उद्योग मित्र समिती अर्थात झूमची बैठक दरमहा होणे आवश्यक आहे. पण बैठकीविषयी प्रशासनात प्रचंड अनास्था आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निवेदनानंतर २८ एप्रिलला बैठक झाली हाेती. त्यानंतर आठ महिन्यांपासून बैठक झाली नाही. तसेच सुरक्षा समितीची बैठकही एक वर्षापासून झालेली नाही. ही बैठक नियमित व्हावी यासाठी उद्योजकांच्या संघटनांनी थेट विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, वीज वितरण कंपनी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सरकारी कामगार विभाग, औद्योगिक विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्राशी निगडित समस्यांचा निपटारा एकाच ठिकाणी व्हावा, या उद्देशाने जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक घेतली जाते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सचिव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक असतात. उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी ही बैठक नियमित व्हावी असे निर्देश आहे. त्यानंतरही बैठक आठ-आठ महिने होत नाही. याविषयी उद्योजकांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यावर डिसेंबर २०२१ मध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

त्यानंतर २८ एप्रिलला बैठक झाली. आता आठ महिने उलटले तरी बैठक झालेली नाही. कोविडनंतर उभारी घेणाऱ्या उद्योजकांसमोर अनेक समस्या आहे. त्यामुळे बैठक घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाकडे केली. विभागीय आयुक्तांनाही निवेदन दिले. पण बैठक झाली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाकडे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अवैध व्यवसाय, चोऱ्या वाढल्याने सर्वच त्रस्त औद्योगिक वसाहतीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह उद्योगांसाठी सुरक्षीत वातावरण निर्माण व्हावे यासाठी सुरक्षा समितीची तीन महिन्यातून एक बैठक होणे आवश्यक असते. पण एक वर्षापासून बैठक झाली नाही. एमआयडीसी परिसरात अवैध व्यवसाय वाढले आहे. धुळे व नरडाणा दोन्ही औद्योगीक वसाहतीत सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी ही बैठक झाली पाहीजे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

जिल्हाधिकारी असून सचिव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक असतात. उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी ही बैठक नियमित व्हावी असे निर्देश आहे. त्यानंतरही बैठक आठ-आठ महिने होत नाही. याविषयी उद्योजकांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यावर डिसेंबर २०२१ मध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

त्यानंतर २८ एप्रिलला बैठक झाली. आता आठ महिने उलटले तरी बैठक झालेली नाही. कोविडनंतर उभारी घेणाऱ्या उद्योजकांसमोर अनेक समस्या आहे. त्यामुळे बैठक घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाकडे केली. विभागीय आयुक्तांनाही निवेदन दिले. पण बैठक झाली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाकडे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ दिल्यावर घेणार बैठक
उद्योग मित्र समितीची बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहे. बैठक घेण्यासाठी यापूर्वी नियोजन झाले होते पण प्रशासकीय अडचणीमुळे बैठक झाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ दिल्यावर बैठक होईल. -उपेंद्र सांगळे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

पाठपुरावा पण उपयोग नाही
जिल्ह्यात अवधान व नरडाणा या दोन मुख्य औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी विविध प्रकारच्या कंपन्या आहेत. त्यांना जाणवणाऱ्या समस्या तातडीने सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजकांच्या संघटनांतर्फे उद्योग मित्र समितीचे समन्वयक तथा जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांकडे बैठक घेण्यासाठी पाठपुरावा होतो. पण लक्ष दिले जात नाही. राहुल कुलकर्णी, अध्यक्ष, लघुउद्योग भारती

या समस्या सुटत नसल्याने नाराजी
औद्योगिक वसाहतीत वाढलेले अतिक्रमण.
पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना नाहीत.
वाढत्या अवैध व्यवसायांमुळे सुरक्षा धोक्यात.
हरणमाळ तलावातील पाणी अधिग्रहण.
सर्व्हिस रस्त्यावर अवैध ट्रक पार्किंग.
नरडाणा औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न.

बातम्या आणखी आहेत...