आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउभ्या महाराष्ट्रात अन् महाराष्ट्राच्या बाहेरही ख्याती प्राप्त असलेल्या येवल्याची पैठणी असो किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लोकप्रिय असलेल्या बुटीच्या नऊवारी साड्यांचा मोठा बोलबाला आहे. या पैठणी धुळ्यात तयार होत असून त्यासाठी शेकडो पॉवरलूम कामगार रोज राबताहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला हा पॉवरलूम व्यवसाय काळानुरूप बदलत गेला आहे. चरख्यावरील सुतापासून तयार होणाऱ्या साड्यांमुळे धुळ्यात तयार होणाऱ्या साड्यांना मागणी आहे.
धुळे शहरातील वडजाई रोड, शंभर फुटी रोड, तिरंगा चौक, यंग यकता सर्कल, मच्छीबाजार, माधवपुरा, देवपुरातील अंदरवाली मशीद भाग या परिसरात रात्री आणि दिवसा नेहमीच खडखड आणि धडधड आवाज सुरू असतो. नवख्या व्यक्तींना हा आवाज त्रासदायक वाटत असला तरी याच आवाजातून स्त्रियांचे सौंदर्य खुलवणाऱ्या आकर्षक अशा साड्या आकार घेतात. काही वर्षांपर्यंत मालेगावपर्यंत पोच असलेल्या धुळ्यातील साड्या आता सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, तामिळनाडूपर्यंत आणि तेथून थेट विदेशातही धुळ्याची पैठणी दाखल झाली आहे. खासकरून येवल्याच्या बाजारात आकर्षक वाटणाऱ्या सेमी पैठणी, सिल्कच्या पैठणी किंवा कॉटन मधील नऊवारी साड्या या धुळ्यातून निर्यात होतात. धुळ्याच्या पॉवरलूम मध्ये बदलत्या ट्रेडनुसार जकार्त पैठणी, सिल्क पैठणी, कोटा सिल्क, पॉलिस्टर बॉय कॉटन, लिनन अशा विविध प्रकारच्या साड्यांना सर्वत्र प्रचंड मागणी आहे. सध्या शहरात १२ हजार पॉवरलूमचे युनिट कार्यरत आहेत. यापैकी दोन हजार युनिटवर फक्त साड्या तयार करण्यात येतात. दहा हजार युनिटवर फक्त सफेद कापड तयार होतो.
धुळ्याची क्वालिटी इतर ठिकाणी मिळत नाही
^धुळ्याची ताकद हे कॉटन आहे. इतर शहरात ही पैठणी, नऊवार, पावणेसात वार, साड्या तयार होतात. मात्र धुळ्याची क्वालिटी इतर ठिकाणी मिळत नाही.मागणीनुसार आणि ग्राहकांच्या आवडीनुसार साड्यांची डिझाइन तयार करत ती बाजारात आणली जाते. आम्ही थेट परदेशात साडी पाठवत नसलाे तरी आमच्या साड्या होलसेलर व्यापाऱ्यांकडून परदेशातदेखील जाऊ लागल्या आहेत. -अशपाक अन्सारी, पॉवरलूम व्यावसायिक, धुळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.