आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्बाेव्हॅक्सचा वापर वाढला:काेविशील्डचा पुरवठाच चार महिन्यांपासून नाही

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविशील्ड लसीचा जिल्ह्याला चार महिन्यांपासून पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शासनाने कॉर्बाेव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरी दिली असून, दुसरा व बूस्टर डोससाठी आता याच लसीचा वापर होतो आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविशील्डचा पुरवठा केला जात होता. बहुतांश आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी हीच लस घेतली आहे.

चार महिन्यांपासून या लसीचा पुरवठा बंद झाला आहे. वारंवार मागणी करूनही ही लस मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने बूस्टर आणि दुसऱ्या डोससाठी कॉर्बाेव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरी दिली आहे. काही नागरिक कोविशील्डच पाहिजे असा आग्रह धरतात. कोरोना प्रतिबंधक लसीचे २९ लाख ६५७ डोस वापरले आहे. पहिला डोस १५ लाख १ हजार ३०५ तर दुसरा डोस १२ लाख ४१ हजार २६४ नागरिकांनी घेतला आहे. जिल्ह्याला २० लाख ११ हजार ६१० कोविशील्ड लस मिळाल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...