आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था‎:खराब रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडेना‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते‎ व पुलांची अतिवृष्टीमुळे दुरवस्था‎ झाली. त्यांच्या दुरुस्तीसाठी‎ शासनाकडे ३५ कोटी ८८ लाखांची‎ मागणी जिल्हा परिषदेने केली होती.‎ पण दोन वर्षांपासून शासनाने‎ दुरुस्तीसाठी निधी दिला नाही.‎ जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त‎ पाऊस झाला. तसेच परतीच्या‎ पावसाने धुमाकूळ घातल्याने‎ ग्रामीण भागात रस्त्यांची दैना झाली‎ आहे.

ग्रामीण भागातील ७६ रस्ते‎ आणि ६६ पूल क्षतिग्रस्त झाले आहे.‎ त्यांच्या दुरुस्तीसाठी ३५ कोटी ८८‎ लाखांची प्रस्ताव जिल्हा परिषदेने‎ शासनाला पाठवला आहे. पण‎ अद्याप निधी मिळालेला नाही.‎ अतिवृष्टीमुळे प्रकाशा ते ब्राम्हणवेल‎ मार्गावरील पूल, प्रकाशा, छडवेल,‎ दहिवेल व सामोडे रस्त्यावरील पूल,‎ नवापूर- पिंपळनेर रस्ता, कुडाशी ते‎ बोपखेल रस्त्यावरील पाइपमोरी‎ खराब झाली आहे. जिल्ह्यातील ७६‎ रस्त्यांसाठी १४ कोटी ५३ लाख व‎ पाइप मोरी, लहान व मोठे पूल‎ दुरुस्तीसाठी २१ कोटी ३५ लाखांची‎ आवश्यकता आहे. प्रस्ताव‎ शासनाकडे पडला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...