आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अनेक भागात सात ते आठ दिवसांनंतर पाणी येते. जलस्राेतांमध्ये मुबलक साठा असला तरी प्रशासनाचे नियोजन नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला. पाणीप्रश्नावर चर्चेसाठी शुक्रवारी बैठक घेण्याचा निर्णय सभेत झाला. मनपा सभागृहात झालेल्या सभेला स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. महिला दिनाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात अनेक महिलांनी पाणीपुरवठा उशिरा होत असल्याची तक्रार केल्याचा आरोप सभेत झाला. साबीर खान यांनी रमजान महिन्याला प्रारंभ होणार असून, या काळात नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. नगरसेवक नरेश चौधरी यांनी पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली. नगरसेवक सुनील बैसाणे यांनीही लक्ष वेधले. याविषयावर पुढील आठवड्यात बैठक होईल.
घरपट्टी कमी केली जावी
अवकाळी पावसाचा मनपा हद्दीतील दहा गावांत राहणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील मालमत्ताधारकांची घरपट्टी प्रशासनाने कमी करावी, ती कमी केली नाही तर २७ मार्चला दहा गावातील नागरिकांसह महापालिकेत उपोषण करू असा इशारा नगरसेवक किरण अहिरराव यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.