आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक जाहीर:उपमहापौरासाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यात बुधवारी व गुरुवार दोन दिवसांत उपमहापौरपदासाठी अर्ज घेणे व जमा करण्याची मुदत आहे. त्यानुसार बुधवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज नेलेला नाही. त्यामुळे गुरुवारी शेवटच्याच दिवशी अर्ज विक्री व दाखल होणार आहे.

उपमहापौर पदाचा भाजपचे नगरसेवक अनिल नागमोते यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागेसाठी निवडणूक होत आहे. उपमहापौर पदासाठी बुधवार व गुरुवार दोन दिवसांत अर्ज विक्री व दाखल करण्याची मुदत आहे. नगरसचिव कार्यालयात नगर सचिवांकडे अर्ज दाखल करावयाचा आहे. अर्ज दुपारी २ वाजेपर्यंत जमा करण्याची मुदत आहे. मात्र पहील्या दिवशी बुधवारी कुणीही अर्ज मुदतीत दुपारी १ वाजेपर्यंत घेतलेला नाही. त्यामुळे गुरुवारीच अर्ज घेणे व दाखल होणार आहे. त्यातूनच चित्रही स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...