आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक:मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी खड्डे जैसे थे च

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा रस्त्यावरील मनोहर चित्रपटगृहापासून थेट हत्तीडाेहापर्यंत साडेचार किलोमीटर लांबीच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर देवपूर बसस्थानक, एसएसव्हीपीएस महाविद्यालयाजवळ असलेले खड्डे गुरुवारीही जैसे थे होते. दुसरीकडे बिलाडी रोडवर मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले.

शहरातील जुने धुळे, गल्ली क्रमांक २ ते ७, वाखारकरनगर, चाळीसगावरोड, मालेगावरोड, स्टेशन रोड, मिल परिसर, साक्री रोड, अग्रवालनगर, कुमारनगर, सिंधी कॉलनी या परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुका आग्रारोडने जातात. या रस्त्यावरील मनोहर चित्रपटगृहापासून मिरवणुका निघतील. या रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत खड्डे मुरूम टाकून बुजवण्यात आले. पाचकंदील चौकात असलेला खड्डा जैसे थे आहे. महात्मा गांधी पुतळ्यापासून पुढे जाताना मोठ्या पुलावर किरकोळ खड्डे आहे. देवपूर बसस्थानकापर्यंत रस्ता सुस्थितीत आहे. देवपूर बसस्थानकाजवळ गतिरोधकाच्या ठिकाणी खड्डे आहे. नवरंग पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकात, एसएसव्हीपीएस महाविद्यालयासमोर खड्डे आहे. एसएसव्हीपीएस महाविद्यालय ते हत्ती डोहापर्यंत बिलाडी रोडवर असलेले खड्डे बुजवले. मिरवणूक मार्ग खड्डे विरहित करण्यासाठी अपवाद वगळता उपाययोजना करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...