आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:दुपारनंतर दाटले ढग; पावसाचाही शिडकावा

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तापमान गुरुवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानाचा पारा सातत्याने ४० अंशावर आहे. त्यामुळे तप्त उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र गुरुवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. वारेही वाहू लागले व काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला आहे. तर सायंकाळपर्यंत पूर्णपणे पावसाळी वातावरण तयार झाले होते.

शहरात जून महिन्यातही तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर आहे. उन्हाळा संपल्यानंतरही तापमानाचा पारा खालावला नव्हता. यामुळे नागरिकांना तप्त उन्हाचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने बाहेर फिरताना उन्हाचे चटके बसत आहे. तर गुरुवारी दुपारी वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी झाली होऊन ढगाळ वातावरण झाले होते. तसेच थोडयावेळाने वारेही वाहू लागले होते. याप्रकारे पूर्णपणे पावसाळी वातावरण होऊन काही प्रमाणात पावसाचा शिडकावाही झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...