आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज लांबवला:दोन वर्षात एकाच घरात दुसऱ्यांदा चोरांचा डल्ला

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मालेगावर रोड परिसरातील महावीर सोसायटीत बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी रोकड व मुद्देमाल लांबविला. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी याच घरात चोरटयांनी हातसफाई केली होती. घटनेबद्दल चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावीर सोसायटीमध्ये आशिष वसंत लिंगडे (वय ४१) हे राहतात. त्यांचा भाऊ पालघर या ठिकाणी राहतात. त्यामुळे लिंगडे हे त्यांच्याकडे गेले होते. ही संधी हेरून चोरटयांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. यानंतर रोकड व किंमती ऐवज लांबवला.

लिंगडे कुटूंबीय बुधवारी रात्री गावावरून परत आल्यावर तुटलेले कुलूपावरुन त्यांना चोरीचा संशय आला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. काही वेळातच चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले. या पथकाने घराजवळ शोध देखील घेतला. परंतु चोरट्यांचा क्लू मात्र मिळू शकला नाही. या घटनेत लिंगडे यांच्या घरातील रोकड, देवी व देवतांच्या चांदीच्या मूर्ती एवढेच काय तर लहान मुलांचा गल्ला फोडून त्यातील रोकड देखील लांबवण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ६५ हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...