आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३८ जागांवर यश मिळेल. आणि मविआ एकजुटीने लढली तरच विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्याला त्यांनी नुकतेच मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेला मविआ २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असे म्हटले होते. थोरातांनी तोच दावा केला. ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. पवारांच्या या वक्तव्याबाबत थोरात म्हणाले की, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. पण कुणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.