आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवर्षी पावसाळ्यात मलेरिया व त्यानंतर डेंग्यूची साथ निर्माण होत असते. अनेकदा डेंग्युमुळे रूग्णांचा मृत्यूही होण्याचा धोका असतो. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाकडून जनजागृती केली जात आहे. तरीही पावसाळ्यात साथ निर्माण होत असते. मात्र गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात ढळून अडलेल्या साडेतीन हजार संशयित डेंग्यू रुग्णांपैकी दोन वर्षापूर्वी एका युवकाचा डेंग्यूचे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे डेंग्यूचे मृत्यु रहाण्याचे प्रमाणही अगदीच नगन्य आहेत. असे असले तरी डेंग्यू, मलेरियाची साथ निर्माण हाऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात अकाली आहे. तसेच नागरिकांनीही काळजी घ्यावी असे अवगाहन केले गेले आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार ४२८ डेंग्यूचे संशयित ढळून आले. त्यातील ८३३ जणांना निश्चित डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर भाग्य पध्दतीने उपचार केल्याने ते रुग्ण बरे झाले. त्यात केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेंग्युमुळे मृत्यु झालेल्यांची टक्केवारी अगदीच कमी आहे. तरीही डेंग्यू हा गंभीर आहे. मलेरिया बरा होताे. मात्र डेंग्यू मृत्युची शक्यता असते. त्यामुळे डेंग्यू संशयित रुग्णांनी वेळेवर उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा ताे घातक ठरू शकताे.
डेंग्यू साथीला आळा घालण्याचे नियोजन ^शासकीय रूग्णालयात केलेल्या चाचणीत डेंग्यूचे लक्षण स्पष्ट झाले तरच ताे डेंग्यूचा संशयित रूग्ण समजला जातो. डेंग्यू झाल्यानंतर वेळेवर औषधोपचार होणे गरजेचे असते.त्यामुळे डेंग्यू पूर्णपणे बरा होऊ शकताे.गेल्या काही वर्षात मलेरीयासह डेंग्यूचे दुरीकरण करण्यास यश आले आहे. अनिल पाटील, मलेरिया अधिकारी
शासकीय कार्यालयांना सूचना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय कार्यालयांना हिवताप अधिकारी कार्यालयाकडून सूचना केल्या आहेत. साथरोगाबाबत लागणारे आैषधे आणि इतरही गरजेच्या वस्तु तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात. साथरोग निर्माण झाल्यास एकाच वेळी औषध व साहित्याची आवश्यकता भासल्या ते उपलब्ध न झाल्यास रूग्णांवर योग्य वेळी उपचार करण्यास अडचणी येत असतात. त्यादृष्टीने आतापासूनच सर्व गाेष्टीची उपलब्ध करून घेतल्यात आपत्तीच्या काळात योग्य पध्दतोने रुग्णांवर उपचार होवून जिल्ह्यात मलेरिया, साथरोगाची साथ पसरणार नाही. त्यादृष्टीने सर्वच शासकीय यंत्रणेला सूचना केल्या आहेत. त्याबाबत एक आढावा बैठकही घेण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.