आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरपूर शहरातील करवंदरोड परिसरात मध्यरात्री दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आली. तसेच अन्य दोन जण पसार झाले.
शिरपूर पोलिसांचे पथक नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. त्या वेळी करवंद रोडवरील बालाजीनगर परिसरात काही जण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांना अडवले. या वेळी अत्तरसिंग मोहनसिंग भील (वय २६), सफू मोहनसिंग भील (वय २२), साहेब लभू भील (वय २२, तिघे रा. कुक्षी जि. धार, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. या वेळी रवींद्र मानसिंग भील व अन्य एक जण पसार झाला. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून तलवार, कट्यार, टॅमी, तीन मोटारसायकली व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे टोळके दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरत असताना ही कारवाई झाली. कारवाईत वाहनासह एकूण १ लाख १७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.