आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वेगवेगळ्या अपघातात तीन ठार; मृतांमध्ये एक महिलाही

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देऊर व पुरमेपाडा शिवारात अॅपेरिक्षा उलटून दोन जण ठार झाले. त्यात एका महिलेचा समावेश आहे. धाडणे फाट्याजवळ मोटारसायकलचा अपघात होऊन तरुण ठार झाला. धुळे तालुका व साक्री पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदला.

धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक रस्त्यावर अॅपेरिक्षा (एमएच-१८-एजे-८३८५) उलटून अपघात झाला. या अपघातात मीराबाई शालिक धनगर (वय. २८) ही महिला ठार झाली. अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल शालिक संतोष धनगर याच्या विरोधात धुळे तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात भरधाव वेगातील वाहनाने अॅपेरिक्षाला (एमएच-१५-यु-९१६९) कट मारल्यामुळे रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षाचालक किशोर भिका अहिरे (वय. ४५, रा. उत्तम नगर, शिवपुरी, नाशिक ) हे ठार झाले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. तिसऱ्या घटनेत साक्री तालुक्यातील धाडणे शिवारात मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात कैलास देवसिंग अहिरे (वय ३५, रा. चिकसे, ता. साक्री) हा तरुण जखमी झाला. त्यानंतर कैलासला साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला हिरे रुग्णालयात नेले जात होते. पण त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...