आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:थेट वन अधिकाऱ्याच्या निवासस्थान आवारातून चोरले चंदनाचे तीन वृक्ष

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य वनसंरक्षकांचे निवासस्थान तथा वनविभागाच्या आवारात लावलेले चंदनाचे तीन वृक्ष चोरट्यांनी ताेडून नेले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोन महिन्यांत चंदन वृक्ष चोरीची ही तिसरी घटना असून सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील फाशी पुलापासून काही अंतरावर मुख्य वनसंरक्षकाचे निवासस्थान व वन विभागाचे कार्यालय आहे. धुळे, जळगाव व नंदुरबार विभागाचे काम या कार्यालयातून चालते. या ठिकाणी वनसंरक्षकाच्या निवासस्थानाजवळ चंदनाचे वृक्ष लावले आहे.

रात्री चाेरट्यांनी संधी हेरून तीन झाडे चोरुन नेली. हा प्रकार रविवारी पहाटे तीन वाजता समोर आला. त्यानंतर चोरट्यांचा शोध सुरू झाला. वनरक्षक चेतन शंकर काळे (वय. ३१) यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.घटनास्थळापासून जवळ चौक व मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या पलीकडे पोलिस अधिकाऱ्यांची घरे आहे. रात्रीच्या वेळी शांतता असताना वृक्षतोड व वाहतूक करताना वाहनाची चाहूल कोणलाही लागली नाही. एवढेच काय तर वन विभागाचे सुरक्षा कर्मचारी अनभिज्ञ होते.

तोडून नव्हे वृक्ष कापला
तिन्ही चंदन वृक्ष कटरने कापून नेण्यात आले. त्यासाठी चोरट्यांनी इंधनही आणल्याचा अंदाज आहे. सुरक्षा कर्मचारी आवाजाच्या दिशेने धावल्यावर चोरटे वाहनासह पसार झाल्याची माहिती आहे.

किमान तिघांचे काम
एकाच वेळी चंदनाची झाडे तोडण्यात आली. तसेच रात्रीतून ती अन्यत्र हलवण्यात आली. त्यामुळे चोरीच्या घटनेमागे किमान तीन किंवा त्यापेक्षा अधिक चोरटे असावे असा निष्कर्ष आहे.

सुटीचा मुहूर्त : गेल्या शुक्रवारी अनंत चतुर्दशीची सुटी होती. तसेच शनिवारी व रविवारी शासकीय सुटी होती. सलग तीन दिवस सुटी आल्यामुळे वन विभागाचे अधिकारी रजेवर गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी हातसफाई केली.

बातम्या आणखी आहेत...