आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांना जन्मठेप:नगरसेवक खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप, चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता; शहादा न्यायालयाने दिला निकाल

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पालिकेचे तत्कालीन बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या खूनप्रकरणी तसेच त्यांचे सहकारी नासिर लियाकत अली सय्यद यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सात संशयितांपैकी तिघांना जन्मठेप व सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उर्वरित चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपींनी दोन्ही शिक्षा एकत्र भोगावी असा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. पथाडे यांनी दिला. यात बाबुलाल अहमद शेख, साजिद उर्फ प्रेम अहमद शेख, जावेद मुक्तार शेख या तिघांना जन्मठेप व सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित मुख्तार अहमद शेख, टिपू मुख्तार शेख,अल्लारखा मुख्तार शेख व माजिद महमूद शेख या चौघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

१४ जून २०१७ रोजी शहरातील गरीब नवाज कॉलनीत पाण्याचा टँकर वरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून जखमी मुजफ्फर अली लियाकतअली सय्यद यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पालिकेचे तत्कालीन बांधकाम सभापती सद्दाम तेली व नासिर लियाकत अली सय्यद हे दोन्ही खाजगी रुग्णालयात गेले असता येथे त्यांच्यावर धारदार शस्त्राने बाबुलाल अहमद शेख, साजिद उर्फ प्रेम अहमद शेख, जावेद मुख्तार शेख, मुख्तार अहमद शेख, टिपू मुख्तार शेख अल्लारखा मुख्तार शेख,माजिद महमूद शेख, या सात संशयितांनी हल्ला केला होता. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान उपचार सुरू असताना तत्कालीन बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा मृत्यू झाला तर नासिर लियाकत अली सय्यद हा गंभीर जखमी झाला होता. याबाबत शहादा पोलिसात नासिर अली लियाकत अली सय्यद यांच्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येवून पोलिसांनी सातही संशयितांना तात्काळ अटक केली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी पूर्ण करून संशयीतांविरोधात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अकिल ईस्माइल यांनी कामकाज पाहिले.

खटल्यात तपासले तब्बल १८ साक्षीदार
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. पथाडे यांच्या न्यायालयात झाली सरकार पक्षातर्फे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले यात प्रामुख्याने तपास अधिकारी शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, डॉक्टर बी डी पाटील, फिर्यादी नासिरअली, याच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्याने तिघांनी हत्या करण्याचा प्रयत्न व जीवे मारण्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...