आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप:शिरपूर तालुक्यातून शिक्षकांसह तीन हजार कर्मचारी संपात सहभागी‎

शिरपूर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यात संपाला प्रतिसाद‎ मिळाला. पंचायत समिती, महसूल,‎ सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य‎ कार्यालय व प्राथमिक, माध्यमिक,‎ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक,‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग‎ नांेदवला. वरिष्ठ महाविद्यालयाच्या‎ प्राध्यापकांनी काम बंद आंदोलनात‎ सहभागी न होता पाठिंबा दिला.‎ शाळेच्या बाहेर सुटीची सूचना लावली‎ होती.

खासगी शाळांचे कामकाज सुरू‎ असले तरी शासकीय मान्यताप्राप्त‎ शाळ बंद होत्या. पंचायत समितीच्या‎ प्रवेशद्वाराबाहेर कर्मचाऱ्यांनी‎ घोषणाबाजी केली. तालुक्यातील दोन‎ हजारावर प्राथमिक, माध्यमिक आणि‎ कनिष्ठ महाविद्यालयीन‎ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व एक‎ हजार शासकीय, निमशासकीय‎ कर्मचारी संपात सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...