आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा समस्येवर उपाय:बायोगॅस प्रकल्पाचे तीन युनिट उभारले जाणार‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जमा होणाऱ्या ओल्या‎ कचऱ्याची विल्हेवाट‎ लावण्यासाठी महापालिका‎ बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारते‎ आहे. हा प्रकल्प ३० टन क्षमतेचा‎ असून, त्याचे वरखेडी रोडवरील‎ कचरा डेपो येथे काम सुरू झाले‎ आहे. याठिकाणी प्रत्येकी १०‎ टनाचे तीन स्वतंत्र युनिट उभारले‎ जाणार आहे.‎ शहरातील कचरा संकलनासाठी‎ मनपाने ठेकेदार नेमला आहे. सर्व‎ कचरा संकलित करून तो‎ वरखेडी रोडवरील कचरा डेपोत‎ टाकला जातो. कचरा डेपोत‎ बायोमायनिंगचे कामही सुरू आहे.‎ तसेच या ठिकाणी असलेल्या‎ गांडूळ खत प्रकल्पात ओल्या‎ कचऱ्यापासून खत निर्मिती केली‎ जाते.

आता शिळ्या अन्नापासून‎ बायोगॅस निर्मिती केली जाणार‎ आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे‎ गांडूळ खत प्रकल्पाच्या शेजारी‎ बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे काम‎ सुरू झाले आहे. या कामाचा ठेका‎ देण्यात आला आहे. प्रकल्पात‎ दिवसाला २ हजार क्युबिक मीटर‎ गॅसची निर्मिती होणार आहे. गॅस‎ साठवण्यासाठी दोन टँक‎ उभारण्यात येतील. या प्रकल्पाचे‎ काम वेळेत पूर्ण करण्यासाठी‎ प्रयत्न होणार असून, प्रकल्प सुरू‎ झाल्यावर ओल्या कचऱ्याची‎ विल्हेवाट लागण्याचा प्रश्न‎ सुटण्यास मदत होणार आहे.‎ वरखेडी रस्त्यावर असलेल्या‎ कचरा डेपोत मोठ्या प्रमाणावर‎ कचरा साचला आहे. या ठिकाणी‎ कचरा ठेवण्यास जागा नसल्याने‎ कचऱ्यावर प्रक्रिया होते आहे.‎

रोज ६० टन ओला कचरा‎
शहरासह महापालिकेच्या हद्दीत‎ आलेल्या दहा गावांतून रोज‎ सरासरी ६० टन ओला कचरा‎ संकलित होतो. त्यातील शिळ्या‎ अन्नापासून बायोगॅसची निर्मिती‎ केली जाणार आहे. या प्रकल्पात‎ निर्मित होणाऱ्या बायोगॅसचा वापर‎ कशासाठी करायचा याचे धोरण‎ अद्याप ठरलेले नाही.‎ महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता‎ अभियान राबवण्यात येते आहे.‎ या अभियानांतर्गत काही ठिकाणी‎ वॉर्डातील कचरा वॉर्डात नष्ट‎ करण्यासाठी प्रयत्न होत आहे.‎ त्याचबरोबर नागरिकांमध्ये‎ जनजागृती केली जाते आहे.‎

बातम्या आणखी आहेत...