आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षण अभियान:प्रदूषण टाळण्यासाठी कर्मचारी मनपात आले सायकलवर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आता दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी महापालिकेतर्फे नाे व्हेईकल डे तथा सायकल दिवस पाळला जाणार आहे. त्यानुसार मंगळवारी आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सायकलवर मनपात आले. प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला.

नाे व्हेइकल डे उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी सायकलवर येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आयुक्त देविदास टेकाळे यांच्या निवासस्थानापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल फेरी काढली. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, अनिल सांळुखे, स्वच्छता निरीक्षक प्रमोद चव्हाण, महेंद्र ठाकरे, शुभम केदार, रूपेश पवार, गजानन चौधरी, मनीष आघाव, साईनाथ वाघ, राजेंद्र पाटील, संदीप मोरे, कैलास मासाळ, सुनील बर्गे, जुनेद अन्सारी आदी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व जण सायकलवर महापालिकेत गेले. या उपक्रमात महापालिकेचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले जाईल.

बातम्या आणखी आहेत...