आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा मिळावी‎; विद्यापीठ विकास मंचचे पालकमंत्र्यांना निवेदन

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या‎ स्थापनेपासून शहरात विद्यापीठाचे ‎उपकेंद्र सुरू करण्याची मागणी‎ आहे. उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध ‎ ‎ करून द्यावी, अशी मागणी‎ विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात ‎ आली आहे. याविषयी पालकमंत्री ‎ ‎ गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात ‎ ‎ आले. या वेळी मंत्री महाजन यांनी ‎ जिल्हाधिकाऱ्यांबराेबर बैठक घेत‎ त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश‎ दिले.‎

या वेळी विद्यापीठ विकास मंचचे‎ विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य‎ नितीन ठाकूर, माजी सिनेट सदस्य‎‎ प्रदीप कर्पे, खासदार सुभाष भामरे,‎ विद्यापीठ विकास मंचचे‎ जिल्हाप्रमुख रोहित चांदोडे, विराज‎ भामरे, अखिल भारतीय विद्यार्थी‎ परिषदेचे शहर मंत्री वैभवी ढिवरे,‎ ओंकार मोरे उपस्थित होते.‎

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६‎ नुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी‎ विद्यापीठाचे उपकेंद्र असावे, अशी‎ कायद्यात तरतूद आहे. गेल्या अनेक‎ वर्षांपासून विद्यापीठ विकास‎ मंचतर्फे धुळे येथे विद्यापीठाचे‎ उपकेंद्र सुरू करण्याची मागणी‎ करण्यात येत आहे. याबाबत‎ पाठपुरावा करण्यासाठी‎ विद्यापीठाची समिती स्थापन‎ करण्यासाठी विद्यापीठ विकास‎ मंचाने पाठपुरावा केला होता.

या‎ समितीच्या शिफारसीनुसार वडेल‎ शिवारात जागा उपलब्ध असून, या‎ जागेची मागणी विद्यापीठ‎ प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी‎ कार्यालयाकडे करण्यात आली‎ होती. अद्याप जागा देण्याबाबतचे‎ आदेश जिल्हाधिकारी‎ कार्यालयामार्फत निर्गमित झाले‎ नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवावा,‎ अशी मागणी करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...