आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षलागवड:गाव आदर्श करण्यासाठी घरापासून सुरुवात करावी ;वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जोपर्यंत कुटुंबात एकत्र बसून चांगले विचार जोपासत नाही तोपर्यंत तुमचे गाव आदर्श होणार नाही. तुम्हाला गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. त्यासाठी गाव, तालुका, जिल्हा आदर्श होईल, या दृष्टिकोनातून गाव आदर्श करण्यासाठी गावागावात व्यसनमुक्तीचा संकल्प, वृक्षतोड थांबवत वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. याचे उदाहरण म्हणजे गुजरात सरहद्दीवरील शहादा तालुक्यातील बहिरपूर पुरुषोत्तमनगर, बामखेडा गावाने केलेले काम हे कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन आदर्श तिलक स्वामी यांनी केले कुकरमुंडा तालुक्यातील सदगव्हाण (गुजरात) येथे स्वामिनारायण मंदिरात प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सवानिमित्त माझे गाव आदर्श गाव तसेच आदर्श पोलिस पाटील यांच्या सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कोठारी उत्तमप्रकाश स्वामी, पूजनीय पूर्णदर्शन स्वामी, आदर्श तिलक स्वामी, ध्यान जीवन स्वामी, भूषण स्वामी, नारायणप्रिय स्वामी, वेदभगत मैत्री आदी संत-महंत उपस्थित होते. पुरुषोत्तमनगर ग्रामसेवक शरद पाटील, महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष बापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्र पटेल यांनी केली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सदगव्हाण येथील युवा व ग्रामस्थांनी सहकार्य केले. सन्मानित करण्यात आलेले सरपंच, ग्रामसेवक : बहिरपूर, पुरुषोत्तमनगर ग्रामसेवक शरद पाटील, बामखेडा येथील सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच व ग्रामसेवक तसेच आदर्श पोलिस पाटील म्हणून वडाळी येथील गजेंद्र गोसावी व धानोरा बापू पाटील व भागवत सेवा समिती धानोरा साधुसंतांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बहीरपूर सरपंच कस्तुरा पवार, ग्रामसेविका कविता गवळे, पुरुषोत्तमनगर सरपंच प्रतिनिधी वंदना चव्हाण यांचा सन्मान केला.

बातम्या आणखी आहेत...