आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार:जळत्या कारचा थरार पहावयास ; महामार्गावर बर्निंग कारचा थरार

नवापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागपूर- सुरत महामार्गावरील पिंपळनेर चौफुली, डायमंड पोल्ट्रीजवळ जळत्या कारचा थरार पहावयास मिळाला. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी उभ्या कार (क्रमांक जीजे ०६ डी १६१९) ला आग लागल्याचे दिसताच सगळ्यांची धावपळ उडाली. गाडीत कोणीही नसल्याने आगीबाबत संशय निर्माण झाला आहे. गाडी जाळली की जळाली, याबाबत चालकाचा शोध घेतला जात आहे.

या घटनेत जीवितहानी झाली नसून काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. अपघात हाेऊन आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कार काही वेळ महामार्गावर उभी होती. त्यानंतर अचानक आग लागल्याचे सांगण्यात आले. गाडीचे काही कागदपत्र, इतर साहित्य महामार्गालगत मिळाले.

पालिका अग्निशमन दलाचे जवान संतोष वाघ, राजेश गावित, भालचंद्र भालेराव, ललित वाघ यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

बातम्या आणखी आहेत...