आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहाने साजरा:मोलगी येथे गावदेवती ; वागदेवांची पारंपरिक पूजा

धडगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी मोलगीतील गावदेवती व वागदेव पूजा ही मागील वर्षी काेरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती; परंतु या वर्षी आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने गावदेवती साजरा करण्यात आली. ही पूजा दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मोलगीला केली जाते.

या पूजेला ५०० वर्षांची परंपरा असून, दरवर्षी गावातील प्रमुख व्यक्ती व पुजारा (पूजाविधी करणारी व्यक्ती) १५ दिवसांपासून मोठ्या श्रद्धेने सांसारिक सर्व गोष्टींचा त्याग करून पालनी करतात आणि सातव्या दिवशी ही पूजा केली जाते. त्यासाठी सर्व कुटुंबांकडून सामूहिक वर्गणी करून धनधान्य गोळा करून पूजा विधी साेहळा पार पडताे. गावदेवती पूजा ही धरती माता, गावातील सर्व व्यक्तीचे, गावाचे, पशुधनाचे, निसर्गातील पशू-पक्षी, कीटक, वनस्पती, गाव, पाडा, नवीन धान्य आणि प्रत्येकाचे आरोग्य यासाठी केली जाते.

बातम्या आणखी आहेत...