आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला आज निरोप:आग्रा रस्त्यावर शिवस्मारक ते गांधी पुतळा दुपारी दाेननंतर वाहतूक बंद; ५५ डेसिबल ध्वनी मर्यादा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाची तयारी सुरू असताना दुसरीकडे पोलिस व जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली आहे. विसर्जन मिरवणुकांमुळे शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत दुपारी दोननंतर बंद असेल. आग्रा रस्त्याला येऊन मिळणाऱ्या उपरस्त्यांवर बॅरिकेटिंग केले जाईल. शहरात ११ तर जिल्ह्यात ४७ ठिकाणी विसर्जन होईल.

पर्यायी रस्ते कोणते : जुना मुंबई-आग्रारोड दोन वाजेनंतर वाहतुकीसाठी बंद असेल. या रस्त्यावरील वाहतूक जुनी महापालिका, न्यू सिटी हायस्कूल मार्गे देवपुरात वळवली आहे. तसेच पांझरा नदीकाठावरील कालिका माता मंदिराजवळील फरशीपूल व गणपती मंदिर पुलावरूनही देवपुरात जाता व शहरात येता येईल. प्रशासनाने डीजेला परवानगी दिलेली नाही. इतर वाद्यांना शांतता क्षेत्रात ४५ व सामान्य ठिकाणी ५५ डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा असेल. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाद्याला व विसर्जनाला परवानगी आहे.

१५ हजार वाहने आज वळवणार
विसर्जन मिरवणूक मार्गावरून इतर वेळी दिवसभरात मोटारसायकल, रिक्षा, कार मिळून सुमारे १५ हजार वाहन धावतात. तसेच ज्या पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवली आहे त्या मार्गावरून रोज साडेचार हजार वाहन धावतात. पर्यायी रस्त्यावर वाहतूक वळल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात ८ ठिकाणी मूर्ती, निर्माल्य दान
पांझरा नदी किनारी कुमारनगर व गणपती पुलाच्या दोन्ही काठावर, गवळीवाडा, अग्रवाल भवन, अंजनशाहा बाबा दर्गासमोर तसेच हत्तीडोह या ठिकाणी मूर्ती व निर्माल्य दान स्वीकारले जाईल. या ठिकाणी विसर्जनासाठी हौद ठेवण्यात आले आहे. तसेच निर्माल्य संकलनासाठी वाहन असतील.

शहरात १२ ठिकाणी असेल पोलिस बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजकमल टी पॉइंट, पाचकंदील, शहर पोलिस चौकी, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक, गोल पोलिस चौकी, गिंदोडिया चौक, श्री स्वामी समर्थ केंद्र, दत्त मंदिर चौक, हत्ती डोह या ठिकाणी बंदोबस्त असेल.

शहरातील ११ ठिकाणी विसर्जन होणार आहे. त्यात पांझरा नदीवरील हत्तीडोह , कुमारनगर, गणपती मंदिर, कालिका माता मंदिर, वडेल रोड पूल, अग्रवाल भवन, होमगार्ड ऑफिस मागील खदान, कदमबांडे नगरातील खदान, एमआयडीसी व तिखी तलाव येथे विसर्जन होईल. या शिवाय शिरपूर तालुक्यात तापी नदीवरील सावळदे व अरुणावती नदीवरील पुल, कालापाणी धरण, सतीदेवी नाला, सांगवी अरुणावती नदी, दहिवद व आंबा येथील पाझर तलाव, करवंद धरण, तापी नदी व अनेर धरण, सुखवद, टाकरखेड, दभाषी येथे तापी पात्र, बुराई नदी, कोडदे, अमरावती धरण, बेटावद, मुडावद, वालखेडा, जातोडा तलाव, विटाई गाव खदान, साक्री तालुक्यात कान नदी, कासारे येथे पांझरा नदी आदी ठिकाणी विसर्जन होईल.

बातम्या आणखी आहेत...