आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज होणार सुरू‎:खांडबारा येथे ट्रान्स्फॉर्मर‎ दाखल; वीज होणार सुरू‎

खांडबारा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील खांडबारा सब स्टेशन येथे काही‎ दिवसांपूर्वी ट्रान्स्फाॅर्मरमध्ये बिघाड झाल्याने‎ खांडबारासह ७५ खेडेपाड्यातील हजारो लोकांना‎ भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत‎ दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नवापूर येथून‎ तातडीने नवीन दहा एमव्हीचा ट्रान्स्फाॅर्मर उपलब्ध करून‎ दिला असून ट्रान्स्फाॅर्मर बदलण्याचे काम खांडबारा सब‎ स्टेशन येथे २ क्रेनचे साह्याने सुरू आहे.

ट्रान्स्फॉर्मर‎ बदलल्यानंतर वायरिंग करून धुळे येथील पथकाला‎ पाचारण करून टेस्टिंगसाठी बोलावण्यात येणार आहे ‎.‎ यानंतर पूर्णपणे खांडबारासह ७५ खेड्यातील विद्युत‎ पुरवठा सुरू होईल, अशी माहिती महावितरणचे‎ खांडबारा येथील सहाय्यक अभियंता हर्षद वळवी यांनी‎ दिली आहे. ट्रान्स्फाॅर्मरच्या सर्व कामाला एक ते दोन‎ दिवस लागतील, अशी माहिती देण्यात आली आहे.‎ नवीन ट्रान्स्फाॅर्मरचे काम पूर्ण झाल्यावर गावाला व‎ शेतीला विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरू होणार आहे. त्यामुळे‎ ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...