आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त:चाळीसगाव-सुरत बसमधून देशी दारुची वाहतूक, 1 हजार 148 बाटल्या जप्त

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मध्यवर्ती धुळे बसस्थानकात आलेल्या बसमधून सुमारे ३४ हजार रुपये किमतीच्या देशी मद्याचा साठा मिळून आला. चाळीसगाव-सूरत बसमधून या मद्याची वाहतूक केली जात होती. कारवाईत ३४ हजार ४४० रुपयांच्या १ हजार १४८ बाटल्या जप्त केल्या आहे. तर धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव-सुरत बस ( एम एच १०, बी एल ३३७५) ही धुळेमार्गे पुढील प्रवासाला जाणार होती. या बसच्या डिक्कीमध्ये पोलिसांनी बाॅक्स तपासल्यावर त्यांच्यामध्ये सुमारे ९० एम एल क्षमतेच्या एकूण १ हजार १४८ बाटल्या मिळून आल्यात. याबाबत बस चालक एस. एस. अहिरे व वाहक एस. आर. चव्हाण यांना विचारणा केल्यावर हा मद्यासाठा कोणी व केव्हा ठेवला हे माहित नसल्याचे सांगितले. पोलिसांनी मद्यसाठा जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...