आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कंटेनरमधून 67 गुरांची वाहतूक; कारवाईनंतर चालक पसार

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील वर्षी शिवारात गुरांची वाहतूक करणारा कंटेनर (क्र. एच. आर. ६१, सी ०४९० ) अडवण्यात आला. या वाहनाची झडती घेतल्यावर त्यात ६७ गाई व गोऱ्हे आढळून आले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता.

या गुरांचे पाय व तोंड निर्दयीपणे बांधून वाहतूक केली जात होती. पोलिसांना पाहून कंटेनर चालकाने अंधारातून पळ काढला. असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.