आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:ट्रकच्या दोन कप्प्यातून 41 गायींची वाहतूक; चालकाने काढला पळ

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुरमेपाडा शिवारातून ट्रकच्या दोन कप्प्यातून ४१ गायींची सुटका करण्यात आली. तर चालकाने काढला पळ काढला. पुरमेपाडा शिवारातून जाणारा ट्रक (एमपी ०९, एसजी ६९१९) पोलिसांनी अडवला. या वाहनाची झडती घेतल्यावर दोन कप्प्यांमध्ये कत्तलीसाठी बांधलेल्या ४१ गायी मिळून आल्या. तर या पैकी एका गायीचा मृत्यू झाला होता. पोलिसांना पाहून चालकाने वाहन सोडून पळ काढला. घटनेबद्दल धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...