आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक:धडगाव-तळोदा यांना जोडणाऱ्या जर्ली पुलावरील प्रवास धोकादायक ; काँक्रीट रस्त्याच्या सळया निघाल्या; पुलावर संरक्षक कठड्यांचाही अभाव

धडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव-तळोदा रस्त्याला जोडणारा व जर्ली चुलवडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जर्ली पूल धोकादायक स्थितीत असून तो शेवटची घटका मोजत आहे. पुलाला संरक्षक कठडेही नसल्याने दोन्ही बाजूने भरधाव आलेली वाहने पुलावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या पुलावरील रस्त्याच्या काँक्रीटमधील सळया वर निघून मोठे खड्डे निर्माण झाले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरील प्रवासी वाहन धारकांना मोठया कसरतींचा सामना करावा लागत पुलावरून गाड्या काढाव्या लागत आहे. बाहगाया, जर्ली, चुलवड, सिसा, मनवाणी, कालिबेल, पाडली या गावातील नागरिक या रस्त्याने तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात. रोज हजारोंच्या संख्येने वाहने जातात. या पुलाजवळ धोक्याची सूचना देणारे फलकही नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत. अपघातात जीव गमावल्यावर संबंधित विभागाला जाग येईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर या पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून पुलास संरक्षक कठडे बसवून देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...