आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:मेंदू, मणके तपासणी शिबिरात दोंडाईचात 110 जणांवर उपचार; 32 रुग्णांची एमआरआय तपासण्या करण्यासाठी निवड

दोंडाईचा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सीनिअर व धुळे येथील श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मेंदू व मणके तपासणी शिबिर घेण्यात आले. शहरातील रोटरी आय हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिरात ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३२ रुग्णांची एमआरआय व अन्य तपासण्या करण्यासाठी निवड करण्यात आली. न्यूरो सर्जन डॉ. अभिजित चंदनखेडे, डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन डॉ.अभिजित चंदनखेडे, डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ. मुकुंद सोहनी, राजेश मुणोत, नगरसेवक हितेंद्र महाले, प्रवीण महाजन, रोटरी सीनिअरचे सचिव अॅड. नितीन अयाचित यांच्या हस्ते झाले. प्रवीण महाजन यांनी शिबिर घेण्याची पार्श्वभूमी सांगितली. डाॅ.जितेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. अॅड. नितीन अयाचित यांनी सूत्रसंचालन केले. राजेश मुणोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी सीनिअर क्लबचे नूतन अध्यक्ष के. टी. ठाकूर, सचिव अॅड. नितीन अयाचित, डॉ. राजेंद्र पाटील, राजेश मुणोत, चेतन सिसोदिया, दिनेश कर्नावट, नामदेव थोरात, राजेंद्र परदेशी, डॉ.राजेंद्र गुजराथी, डॉ. दीपक सराफ, डॉ. अनिकेत मंडाले, डॉ. सचिन पारख, संजय छाजेड, किशोर मालपूरकर, हुसेन विरदेलवाला, दिलीप वाघेला, सौरभ मुणोत, डॉ. अनिल धनगर, जवाहर केसवानी, राकेश पाटील, शिवनेरी प्राथमिक व मंजुळाबाई महाले आश्रमशाळा तसेच रोटरी आय हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...