आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Tree Plantation With Distribution Of Books, Pamphlets, Education On The Work Of National Leaders; Various Activities On The Occasion Of The Anniversary Of Maratha Seva Sangh| Marathi News

सामाजिक:पुस्तक, वह्या वाटपासह वृक्षारोपण, राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर केले प्रबोधन; मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यासह शहरात विविध कार्यक्रम झाले. त्यात पुस्तक, वह्या वाटप, वृक्षारोपणासह अन्य कार्यक्रमांचा समावेश हाेता.शहरातील सरस्वती पॅरा मेडीकल महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाचे वाटप झाले. या वेळी विद्यार्थ्यांना मराठा सेवा संघाच्या कार्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा प्राचार्या पूजा भामरे यांनी दिली. छात्र भारती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संघटक मनीष पाटील, प्रा. प्रियंका रेलन, सविता पाटील उपस्थित होते. साक्री येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडतर्फे ग्रामीण रुग्णालयात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. अमोल अहिरे यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप झाले. वृक्षारोपण झाले. संघाचे तालुकाध्यक्ष प्राचार्य बी. एम. भामरे यांनी माहिती दिली.

या वेळी प्राचार्य डॉ. पी. एस. सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक नांद्रे, राजेंद्र अहिरे, अनिल अहिरे, शीतल सनेर, डॉ.शत्रृघ्न पाटोळे, रुमा गावती, सीता गावीत, रुपाली देसले, रुपाली उगले आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघातर्फे नगाव, तिसगाव, ढंढाणे, वडेल, रामनगर, हनुमंतवाडी परिसरात वृक्षारोपण झाले. शेतकऱ्यांना माहिती पत्रकांचे वाटप झाले. शहरातील नकाणे रोड परिसरातील रत्ननगर, साई दर्शन कॉलनी, योगेश्वर नगर कॉलनीत प्रवीण देवरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना पेन्सिल वाटप करण्यात आल्या. या वेळी माजी सैनिक दगडू पाटील, प्रमोद पाटील, सुनील सोनवणे, नरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, ईश्वर पाटील, दीपक सनेर, नितीन पाटील, किशोर देवरे, दीपक महाजन आदी उपस्थित होते. जिल्हाभरात कार्यक्रम झाले.

दोंडाईचात करण्यात आले वृक्षारोपण
मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नाना पाटील, चंद्रशेखर सनेर यांच्या हस्ते दोंडाईचा बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण झाले. बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील, अध्यक्ष अरुण चौधरी, विजय मराठे, गुमास्ता कामगार संघटनेचे अध्यक्ष भय्या चौधरी, भरत उपाध्ये, गोपाल लखोटे, भय्या गिरासे, सतीश सारडा, राजमल जैन, संजय बोरसे, प्रवीण पाटील, युवराज पाटील, हर्षल कागणे, राकेश गिरासे, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्तविक नाना पाटील यांनी केले.

संत गाडगे महाराज परिषदेतर्फे कार्यक्रम
संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे कोरके नगरात इन्कलाब जिंदाबाद नाटक सादर करण्यात आले. या वेळी प्रा.वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षा शारदा पाटील यांनी मी महात्मा फुले बोलतोय या विषयावर अभिनय सादर केला. विभागीय अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय या विषयावर तर आशा पाटील यांनी शाहु महाराज, जिल्हाध्यक्षा शीतल पाटील यांनी सुखदेव तर तालुकाध्यक्षा ज्याेती पाटील यांनी राजगुरु यांच्यावर नाटीका सादर केली. कल्याणी मोरे, प्रतिमा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...